JCB चा रंग पिवळाच का असतो ? का नसतो काळा, निळा, हिरवा?

मुंबई : जे मशीन खोदकाम करतं, त्या मशिनला जेसेबी म्हणतात. ते मशीन नाही तर कंपनीच नाव आहे. तुम्ही पाहिलं असेल कुठेही खोदकाम चालू आहे. तसेच काही सामान उचलण्यासाठी ज्या काही छोट्या, मोठ्या क्रेन असतात किंवा बॅकहो लोडर ( ज्याला तुम्ही जेसेबी नावाने ओळखता ) यांचं काम चालतं. ही जड सामान उचलणारी, खोदकाम करणारी मशीनं पिवळ्या रंगाची असतात.  जेसेबीच काय कोणत्याही कंपनीचं मशीन असो तो नेहमी पिवळ्या रंगांचा असतं.

तुम्ही अनेकदा पिवळ्या रंगाचे जेसेबी किंवा क्रेनला काम करताना पाहिलं असेल, परंतु कधी विचार केलाय का की, असं का असतं ते ? कंस्ट्रक्शन साइटवर काम करणारे मशीन पिवळ्या रंगाचे का असतात ते…

या प्रश्नाचं उत्तर जाणून  घेण्यासाठी तुम्हाला जेसेबीचा संपूर्ण इतिहास माहिती करून घ्यावा लागेल. तसेच जेसेबी पिवळाच का असतो. हे माहिती करून घेण्यासाठी ही छोटीशी माहिती पुरेशी आहे.

जेसेबी हे कंपनीच नाव आहे. जे मशीन खोदकाम करतं, त्या मशीनला तुम्ही जेसेबी म्हणत असतात. ते मशीन नसून कंपनीच नाव आहे. जेसेबी ही एक कंपनी आहे. जी अनेक वर्षापासून कंस्ट्रक्शन साइटवर वापरण्यात येतात, त्या मशिनांची निर्मिती करते. त्यात एक मशीन आहे, जे की खोदकाम करतं.

या मशीनच नाव बॅकहो लोडर आहे. अशा पध्दतीने सर्व मशिनांची वेगवेगळी नाव आहेत. कंपनीने अशा पध्दतीने १९४५ साली अशा मशीनाचं उत्पादन सुरू केलं .आणि सर्वात आधी एक ट्रोली बनवण्यात आली होती.

या मशीनला पिवळा रंग कधीपासून?

जेसेबीने १९४५ नंतर वेळोवेळी नवनवीन मशीनांचं उत्पादन केलं आणि अनेक बदल केले. कंपनीने पहिलं बॅकहो लोडर बनवलं होतं, ते १९५३ साली ते निळ्या आणि लाल रंगाचं होतं. नंतर यामध्येच बद्दल करून  १९६४  साली बॅकहो लोडर बनवलं.
जे पिवळ्या रंगाचं होतं. यानंतर मात्र आतापर्यंत पिवळ्या रंगाचेच मशीन बनवलं जात आहेत. मुळात इतर कंपनीवाले देखील बांधकाम साइटवर वापरण्यात येणारे मशीनंही पिवळ्या रंगाचेच बनवतात.

पिवळा रंग ठेवण्यामागे सुरक्षेचा दृष्टीकोन आहे. त्यामुळेच या मशिनाचा रंग पिवळा असतो. आपण हे सुद्धा पाहिलं असेल की बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगारांचं सुद्धा हेल्मेट पिवळ्या रंगांचे बनवले जातात.

जेसीबीने बनवलं होतं निळ्या रंगांचे जेसीबी ?

पिवळ्या रंगांचे जेसेबी बनवण्यास सुरूवात झाल्यानंतरही कंपनीने निळ्या रंगांचे जेसेबी बनवलं होतं. कारण ते फक्त कंपनीच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त.

जे इको हॅकहो लोडर होतं. या मशीनांमध्ये यूनियर जॅक कलरचा वापर करण्यात आला होता. ते इंग्लंडच्या झेंड्यासारखं दिसायचं…