मोठी बातमी! एक आश्चर्यजनक प्रेम कथा, करुणा धनंजय मुंडे आता ते रहस्य उलगडणार

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते न्यायमंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आले आहेत. त्यांच्या जोडीदार करूणा धनंजय मुंडे यांच्यामुळे ते सतत चर्चेत येत आहेत. आता करूणा मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
आपली प्रेमकथा पुस्तक स्वरूपात मांडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. आता यामध्ये त्या कोणत्या गोष्टींचा खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही महिन्यांपूर्वी करुणा यांच्याबर आपले लग्न झाले असून त्यांच्यापासून आपल्याला दोन मुलं आहेत, त्यांचा संभाळ आपणच करतो असे त्यांनी सांगितले होते. यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती.
आता हे प्रकरण शांत झाले असताना पुन्हा एकदा या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. आता त्या पुन्हा या पुस्तकात काय काय खुलासे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे विरोधकांना देखील मोठा मुद्दा सापडणार आहे.
सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी मांडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आता या प्रकरणामुळे पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाद कधी सुरू झाला?
सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. मुलीने मुंडेंविरूद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले होते. रेणूची बहीण करुणाशी संबंध असल्यामुळे त्यांना दोन मुले असल्याचे खुद्द धनंजय मुंडे यांनी उघड केले होते.

रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर काय आरोप केले?
रेणू शर्मा यांनी ट्विटरवर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्याच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली. शर्मा यांनी बलात्कार आणि शारीरिक शोषणाचा आरोपही केला होता. आता या पुस्तकात नेमके काय दडले आहे याची उत्सुकता सर्वाना आहे.